Good Morning Quotes in Marathi – शुभ सकाळ मराठी संदेश

सकाळच्या सुंदर शुभेच्छा आणि सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सकाळी उठून मनाला प्रेरणा देणारे सुविचार वाचले की, संपूर्ण दिवस आनंददायी आणि ऊर्जेने भरलेला जातो.

या “Good Morning Quotes in Marathi” मध्ये आपल्यासाठी निवडलेल्या काही प्रेरणादायी सुविचारांचा संग्रह आहे, ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल आणि जीवनात नवी दिशा मिळेल. मराठी भाषेतील या सुविचारांनी तुम्हाला प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या उमेदीनं करण्यास मदत होईल.

Good Morning Quotes in Marathi

Good Morning Quotes in Marathi

सुप्रभात
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली.
उठा आता सकाळ झाली!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटं सुगंधित करून जातो.

जीवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल,
पण खोटं बोलून “आनंद” देण्याचा प्रयत्न करू नका.
कारण त्यांचं आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर.”

Good Morning Quotes in Marathi

हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्याबरोबर आहे, नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा मिळत नाही.

माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. शुभ सकाळ !

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. शुभ सकाळ !

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला, कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते.

Good Morning Status in Marathi

Good Morning Status in Marathi

आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर. गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर. शुभ सकाळ !

आयुष्य फार अवघड शाळा आहे, आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. जर काही गोष्टी आवडल्या नाहीत, तर सांगायला उशीर करू नका.

मला श्रीमंत होण्याची गरज नाही. मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती.

माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर, कधीकधी साथ देणार नाही,
पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही एकटे पडू देणार नाही.

सोनेरी सूर्याची किरणे आणि सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा फक्त सोन्यासारख्या लोकांसाठीच.

Good Morning Quotes in Marathi

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि हरलो तरी इतिहासच.

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील सर्व समस्या दूर होतात.

आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाहीत आणि काही तोडता येत नाहीत. जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत. चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत. सकाळच्या सुंदर शुभेच्छा !

सोन्याचा साठा करुन मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या सारखा सोन्याहून मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत. शुभ सकाळ !

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असं म्हणतात;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठीसुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.

Good Morning Wishes in Marathi

Good Morning Wishes in Marathi

जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. सुप्रभात !

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात.

आज एक नवीन दिवस आहे आणि त्याच्याबरोबर नवीन संधी देखील आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमची सकाळ चांगली जावो.

मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा काही वेगळीच असते. शुभ सकाळ !

गर्व करून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.

फुलाला वाढायला सूर्यकिरणांची आवश्यकता असते, तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. तुमच्या गुणवत्तेवर कोणी शंका घेत असेल तर कमीपणा वाटू नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.

Good Morning Wishes in Marathi

दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवलं. सुखाचं पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवलं. आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवलं. शुभ सकाळ !

मानवी जीवन यशस्वी व्हायचं तर तडजोड हाच एक मार्ग आहे.
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, ती परिस्थितीवर केलेली मात असते.

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोकं आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.

आयुष्य खूप लहान आहे, प्रेमाने गोड बोलत रहा. धन-दौलत कोणी देत नसत, फक्त माणुसकी जपत रहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, तुम्ही हाक द्या, मी प्रेमाने साथ देईन.

माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही. यातच माझा विजय आहे.

जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं.
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो.
तुमची किंमत तेव्हा होईल, जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.

शुभ सकाळ मराठी संदेश

शुभ सकाळ मराठी संदेश

स्वभाव अशी गोष्ट आहे जी नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवते. चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणून स्वभाव हेच माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे. शुभ सकाळ !

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो, यावरून त्याची किंमत होत नाही.
तो इतरांची किती किंमत करतो, यावरून त्याची किंमत ठरते.

मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही. घर छोटे असलं तरी चालेल, पण मन मात्र मोठं असलं पाहिजे.

शुभ सकाळ मराठी संदेश

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो “नाही” लवकर बोलल्यामुळे आणि “हो” उशिरा बोलल्यामुळे. शुभ सकाळ !

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही. ती असते “आपलं आयुष्य”, म्हणूनच मनसोक्त जगा!

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे.
दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे.

शुभ सकाळ मराठी संदेश

नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. शुभ सकाळ !

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्याच चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही.

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात. ती फक्त पहायची असतात. कधी कधी त्यात रंग भरायचे असतात. पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायचं नसतं. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. सर्वच काही आपलं नसतं. शुभ सकाळ !

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते, एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. सुप्रभात !

देवाने प्रत्येकाचं आयुष्य कसं छान रंगवलं आहे.
आभारी आहे मी देवाचा, कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय.

Good Morning Images Marathi

Good Morning Images Marathi

शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा, कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात. शुभ सकाळ !

आपला आजचा दिवस आनंदात जावो. यश आपल्याच हातात असतं. प्रयत्नाची पराकाष्ठा करून तर बघा. स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा.

जो डोळ्यांतील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.

मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो.
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

Good Morning Images Marathi

तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते ! जर आपल्याला गुलाबासारखं बहरायचं असेल तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

मनुष्याला अडचणींची गरज असते, कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहेत.

लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतोस…? मी म्हणतो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझं दुःख कुणाला सांगत नाही.

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.

Good Morning Images Marathi

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. शुभ सकाळ !

कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही, कारण त्यांना माहित असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलं आहे. प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय. नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. शुभ सकाळ !

पक्षी जेव्हा जीवंत असतो, तेव्हा तो किडे-मुंग्यांना खातो.
पण जेव्हा पक्षी मरण पावतो, तेव्हा तेच किडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.

बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात उडावं,
पण ज्या घरट्याने ऊब दिली, ते घरटं कधी विसरू नये.

प्रत्येक फुल देवघरात वाहिलं जात नाही, तसंच प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं देवाचरणी शोभतात, तशीच मोजकीच माणसं क्षणोक्षणी आठवणारी असतात.

Good Morning Quotes Marathi for Love

Good Morning Quotes Marathi for Love

धुक्यानं एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठीही कुठेतरी काही चांगले घडत असते.

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची. सकाळच्या सुंदर शुभेच्छा.

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.

Good Morning Quotes Marathi for Love

चांगली माणसे आपल्या जीवनात येणे हे आपली भाग्य असते. आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणे हे आपल्यातली योग्यता असते.

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेक असतात, पण मदतीचा हात देणारे तेच जिवलग असतात. शुभ सकाळ !

आयुष्य खूप सुंदर आहे, उतुंग भरारी मारा, ढगांवर उडणाऱ्या गरुडालाही तुमचा हेवा वाटला पाहिजे इतके मोठे व्हा.

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वरालाही देणे भाग पडेल.

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही, पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही. शुभ सकाळ !

सिंह बनून जन्माला आलो तरी स्वतःचं राज्य मिळवावं लागतं कारण जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.

Good Morning Quotes Marathi for Love

चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावं,
परंतु नळाला पाहून चिखलात जावू नये.
तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावू नये.

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते, कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.

हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही.

दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. शुभ सकाळ !

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही. नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही. विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही, कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही.

Good Morning Quotes Marathi for Whatsapp

Good Morning Quotes Marathi for Whatsapp

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो!
जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं.”

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण.
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवूया प्रसन्न मन.

कळी सारखे उमलून,
फुलासारखे फुलत जावे.
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे.

काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं.
कारण जो पर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.

Good Morning Quotes Marathi for Whatsapp

तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात, पण एक माचिसची काडी लाखो झाडं जाळून खाक करू शकते. शुभ सकाळ !

आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या, चांगलच मिळेल. शुभ सकाळ !

जीवनात जगताना असे जगा की,
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे.

उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.
जबाबदारी म्हणजे काय हे सांभाळल्याशिवाय कळत नाही.

Good Morning Quotes Marathi for Whatsapp

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात गणपती दर्शनाने करूया… शुभ सकाळ !

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका.

Good Morning Quotes Marathi Text

Good Morning Quotes Marathi Text

कोणी आपल्याला वाईट म्हटलं तरी फारसं मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. शुभ सकाळ !

सुंदर दिवसाची सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.

चांगली भूमिका, चांगली ध्येयं आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.

जगातील फक्त मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. गमावू नका. नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.

दु:खाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. शुभ सकाळ !

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत. शुभ सकाळ !

Good Morning Quotes Marathi Text

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि आपली माणसे किती लांब असली तरी आठवण ही येणारच. शुभ सकाळ !

नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा. शुभ सकाळ !

दिवा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका, चांगले कर्म करत रहा. तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील. शुभ सकाळ !

सत्याची महानता फार मोठी आहे.
सत्य बोलणारा मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहीत असतं विजय हा सत्याचाच होतो.

प्रत्येक सकाळ आपल्यासाठी नवी संधी घेऊन येते. सकाळच्या या सुविचारांनी केवळ दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी असं नाही, तर आपल्या जीवनात विचारांची शांती आणि आनंद पसरावा हाच या “Good Morning Quotes in Marathi” चा उद्देश आहे.

या प्रेरणादायी विचारांनी तुम्हाला उभारी मिळेल आणि तुम्ही तुमचं जीवन अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून जगण्याचा प्रयत्न कराल.

Leave a Comment