Shayari in Marathi: Best Sher Shayari Marathi Love, Friendship, Attitude & Motivational

मराठी शायरी Sher Shayari in Marathi is a treasured form of expression, weaving emotions into the intricate fabric of words and resonating with the melody of the Marathi language. This article delves into the heart of Sher Shayari Marathi, an eloquent tradition that captures the essence of experiences, both sweet and bitter, in a rhythmic manner.

With each verse of मराठी शायरी Shayari in Marathi, you’re invited to embark on a journey through a myriad of emotions, celebrating Love, Friendship, Attitude, Sad, Life, Motivational and the numerous facets of life. Sher Shayari Marathi is not just a medium of expression, but a testament to the linguistic beauty and the depth of emotions that the Marathi Text.

As we explore Shayari in Marathi, and more specifically मराठी शायरी Sher Shayari Marathi, prepare to immerse yourself in a realm where words dance with emotions, creating a symphony that echoes the heartbeat of life itself.

Love Shayari Marathi

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

वाटत कधी कुणी आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.

प्रेम हे वार्‍यासारखे आहे,
तुम्ही ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन.
ती आपली मुलगी असेल.

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

Shayari Marathi Love

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

Shayari Marathi Love
Shayari Marathi Love

तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

Love Shayari in Marathi

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.

Read More:

Love Shayari in Marathi
Love Shayari

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

Prem Shayari in Marathi

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

Prem Shayari
Prem Shayari

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

Friendship Shayari Marathi

आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते
आणि नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात
ते म्हणजे. मित्र!

Friendship Shayari
Friendship Shayari

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपूलकी
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली तूझ्या रूपाने!!

जेवा आपण आपला वरून जास्त कोणाचा विचार करतो
ती मैत्री असते

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो
तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि
तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव

Shayari Marathi Friendship

ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही
असे जीवन जगण्यात मजा नाही

Shayari Marathi Friendship
Shayari Marathi Friendship

मैत्री ती नाही जी जीव देते
मैत्री ती ही नाही जी हास्य देते
खरी मैत्री तर ती असते जी
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी
एकवेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी!!

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते
ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस

जीवन एक Railway Station प्रमाणे आहे
प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते
पण मैत्री हे त्याच स्टेशन वरील Enquiry Counter आहे
जे नेहमी म्हणत असते May I Help You

समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री

जर मैत्री संपूर्ण आणि सर्किट सारखी असेल तर
म्हणजे बापू दिसला, मग तो दिसतो…!

Friendship Shayari in Marathi

प्रेम असो वा मैत्री
जर हृदयापासून केली तर
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही

Friendship Shayari
Friendship Shayari

मैत्री होते – एक वेळ
लक्षात ठेवा – कोणतीही वेळ
आपण आनंदी राहा – सर्वकाळ
हे माझे आशीर्वाद आहे – लाइफ टाइम

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,
नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा

आपली मैत्री एक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडू ही शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो

मित्र कितीही वाईट झाला तरी
त्याच्यासोबत मैत्री नका तोडू
कारण पाणी कितीही खराब झाले तरी
ते आग विजवण्याचा कामात येतच असते

मैत्री असावी मना मनाची
मैत्री असावी जन्मो जन्मांची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी

साथ चालण्यासाठी साथी हवा
अश्रू रोखण्यासाठी हसू हवं
जिवंत राहायला जीवन हवं आणि
जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा

Maitri Shayari Marathi

एक दिवस देव म्हणाला
किती ह्या मैत्रिणी तुझ्या
यात तू स्वत: ला हरवशील
मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां
तू पुन्हा वर जाणं विसरशील…!!

Maitri Shayari
Maitri Shayari

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी
आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो
आणि गरज असली कि दिसत पण नाही

माझ्या मैत्रिणीला वाटतं मी तीला घाबरतो
पण ते नाटक असत
खरं तर मी तीचा आदर करत असतो

जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे
पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे
ही एक असामान्य गोष्ट आहे

मैत्री एक थंड हवेची लहर आहे
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे
बाकीच्यांसाठी काहीही असो
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे

काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते
ती मैत्री असते
कोणीही आपले नसताना अचानक आपले होते
ती मैत्री असते
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते
ती मैत्री असते
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते
ती मैत्री असते
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते.

काही नाती बांधलेली असतात,
ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

Attitude Shayari Marathi

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते

Attitude Shayari
Attitude Shayari

खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी.

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..

माझी Style आणि माझा Attitude तुझ्या औकातच्या बाहेर आहे,
ज्या दिवशी तू जानशील
त्यादिवशी तू जगातून जाशील.

मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.

Shayari Marathi Attitude

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.

Shayari Marathi Attitude
Shayari Marathi Attitude

बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.

विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला

येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

Attitude Shayari in Marathi

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.

Attitude Shayari in Marathi
Attitude Shayari in Marathi

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार

आजचा दिवस कठीण आहे
त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल
पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा असेल.

लोकांकडे
जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण
त्यांना सवयच असते.
स्वतःचं ठेवायचं झाकून आणि
दुसऱ्याचं बघायचं वाकून.

जीवनाचा खरा माझा तेव्हा येतो जेव्हा,
तुमचे दुश्मन देखील तुमच्याशी हात मिळवण्यासाठी
रस्ता करताय करताय तरसतात

गरज संपली की काही जण
तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
पण विचारयला येत नाही..

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर
शंका घेत नाहीत..
आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही..

तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत
तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते
लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत
लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा
कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे
लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कराव लागतं
तुम्ही तयार आहात ना ?

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..

Sher Shayari Marathi Attitude

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

Sher Shayari Marathi Attitude
Sher Shayari Marathi Attitude

Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले
त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल
हे सगळं तुमच्या हातात नसेल
पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता
हे तुमच्या हातात आहे.

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.

चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू.

दुसरे लोक पैशामुळे
“Brand” असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे.

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून
नांदायला जायचय.

नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.

राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

Sad Shayari Marathi

जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

Sad Shayari Marathi
Sad Shayari Marathi

कितीही जगले कोणी कोणासाठी
कोणी कोणासाठीच मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.

जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढंच असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे.
उद्या माझी आठवण तुला येईल.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

सोडून गेलेली व्यक्ती ?कधीतरी परत येईल?
अशी अपेक्षा ठेवल्यामुळे,
आपल्या मनाचदुसऱ्या ? व्यक्तीसोबत
नाता जोडायच धाडस होत नाही…

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

Shayari Marathi Sad

तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

Shayari Marathi Sad
Shayari Marathi Sad

कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत,
तरी माझा हातात हात घे.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असतं,
तुम्ही प्रेम कोणावरही करा
पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर
अगदी शेवटपर्यंत करा.

तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस
तिच्यापासून जी स्वतः रडून
जी तुला हसवेल.

कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

Sad Shayari in Marathi

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

Sad Shayari
Sad Shayari

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.

जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात.

माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..

जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?

प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

Sher Shayari Marathi Sad

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

Sad Shayari
Sad Shayari

प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.

आज मला खूप रडावसं वाटतंय,
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,
भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,
अन आपलं कोणीच नाही म्हणून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे.

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.

खोट बोलतात सगळे,
म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,
अहो खरे काय ते मला विचारा ना,
ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

Life Shayari Marathi

जगाला काय आवडते ते करू नका,
तुम्हाला जे वाटते ते करा,
कदाचित उद्या तुमचे वाटणे,
जगाची आवड बनेल.

Life Shayari Marathi
Life Shayari Marathi

प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.
कारण, प्रेम प्रत्येकावर करता येत नाही.
आणि, विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.

जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी
स्पष्टपणे जो नाकारतो त्याला
कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

असं काम करा की,
नाव होऊन जाईल..
नाही तर, असं नाव करा की,
लगेच काम होऊन जाईल.

प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर आपण चांगले आहोत म्हणून.

प्रेमळ माणसं ही,
इंजेक्शन सारखी असतात,
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो.

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर,
आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो.
म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून,
पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.

या जगात कुणीही आपला मित्र किंवा,
शत्रू म्हणून जन्माला येत नाही.
आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती,
यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू.

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे
खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

किती दिवसाचे आयुष्य असते,
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावं ते हासून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते.

Shayari Marathi Life

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणे असतात,
एकतर आपण,
विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करीत बसतो.

Shayari Marathi Life
Shayari Marathi Life

कधी कधी संकटे आली की,
२ पावले मागे सरकनेच हिताचे असते,
वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे,
तर पुढे झेप घेण्यासाठी.

आपला जन्म होतो तेव्हा आपण
रडत असतो आणि लोक हसत असतात,
मरतांना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील!

विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगलं घडत असतं..
इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं.

विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ
आली की विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.

माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम, वागण्यात नम्रता,
आणि हृदयात गरिबीची जाण,
असली की, बाकी गोष्टी
आपोआप घडत जातात.

आपल्या आयुष्यात,
एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका !
कारण जेव्हा ते बदलतात,
तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग
कमी पण स्वतःचा जास्त राग येतो !

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडे आहे,
सोडवाल तितके थोडे आहे.

जीवनात सुख दुःख दोन्ही
आपण स्वीकारलेच पाहिजेत,
कारण ती आपणच
निर्माण केलेली आहेत..
हे सूत्र लक्षात घेतले तर,
मनुष्य सरळ वागू शकेल.

जीवन चहा बनवण्यासारखे आहे..
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या आणि,
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण
जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

Life Shayari in Marathi

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा,
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

Life Shayari in Marathi
Life Shayari in Marathi

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे किंवा
उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले.

आयुष्यात कोणत्याही मुलीचा
हात धरायला,
हिम्मत लागत नाही..
हिम्मत लागते ती,
तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला.

ऐकणं महत्वाचं आहेच,
पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते
आचरणात आणणं..
किती ऐकलं यापेक्षा आचरणात
किती उतरवलं, यावरच माणसाचं
यशापयश अवलंबून असतं.

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते,
त्यांचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

जेव्हा काही लोक आपली
फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण
फक्त अंधार झाल्यावरच येते.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे,
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

कोणीतरी बर्फाला विचारले,
आपण एवढे थंड कसे?
बर्फाने अगदी छान उत्तर दिले,
माझा भूतकाळ पण पाणी
आणि भविष्यकाळ पण पाणीच!
मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ?
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा.

ताकदीची गरज त्यांनाच लागते,
ज्यांना काही वाईट करायचे असते,
नाही तर जगात सर्व काही
मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते,
कारण प्रेमानेच जग जिंकता येते.

अशा माणसाला कधीच गमावू नका,
ज्याच्या मनात तुमच्याविषयी,
आदर, काळजी आणि प्रेम असेल.

Sher Shayari in Marathi Life

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका..
नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.

Sher Shayari in Marathi Life
Sher Shayari in Marathi Life

जग नेहमी म्हणते,
चांगले लोक शोधा आणि,
वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
लोकांमध्ये चांगले शोधा व,
वाईट दुर्लक्षित करा कारण,
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!

किती त्रास द्यावा एखाद्याला,
यालाही काही प्रमाण असते,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते.

फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,
पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते,
आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा.

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते.

चुकीच्या निर्णयामुळे
आपला अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय बरोबर कि चूक
याचा विचार करायचा नाही,
निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं.

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न
पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर?
दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे
स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

छोट्या या आयुष्यात,
खूप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच मिळत नसतं,
असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,
आपलं आभाळ मात्र रिकामं असतं…
हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,
माणसाला मिळत नसतात,
पण न मिळणाऱ्या गोष्टीच,
माणसाला का हव्या असतात…?

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात.

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावे लागते..
कसे आहे विचारले तर,
मजेत म्हणावे लागते..
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,
तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,
तुमचा हात रिकामा करीत असते.

Motivational Shayari Marathi

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

Motivational Shayari Marathi
Motivational Shayari Marathi

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

Shayari Marathi Motivational

अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

Shayari Marathi Motivational
Shayari Marathi Motivational

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

Motivational Shayari in Marathi

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

Motivational Shayari in Marathi
Motivational Shayari in Marathi

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

समर्थक कमी झाले तरी चालतील,
पण विरोधकांची गर्दी
कमी होता कामा नये,
कारण आपल्या प्रगतीत
विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

सांभाळून चला,
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

Motivational Sher Shayari in Marathi

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

Motivational Sher Shayari in Marathi
Motivational Sher Shayari in Marathi

नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.

कर्म जेव्हा वसुलीवर येते,
त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही,
त्यामुळे आपल्या कर्माशी आणि
कार्याशी प्रामाणिक राहून
आयुष्याची वाटचाल करा.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात,
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

आपला वेळ मर्यादित आहे,
तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात
वाया घालवू नका.

मराठी शायरी
मराठी शायरी

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

Marathi Shayari Text

संपुर्ण जग प्रेमळ होईल, असे प्रेम करा,
कारण मनुष्यजन्म फ़क्त एकदाच आहे,
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण, निघून गेलेली वेळ,
आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.

Marathi Shayari Text
Marathi Shayari Text

मला पाहुन तू, गाल्यात ला गाल्यात हसतेस,
आणि मी बोलल्यावर माझ्यावर पटकन रूसतेस,
पण तुला चॉकलेट दिल्यावर,
पटकन माझ्या कुशीत घुसतेस,
अस कस विचित्र प्रेम तू माझ्यावर करतेस.

अपमान होऊन पण आपण,
त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो,
यालाच खरं प्रेम म्हणतात.

आपल्या दोघांच छोटस घर असेल,
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल,
कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे,
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे…..

एक बोलू का,
आजकालच्या प्रेमामध्ये अस होत आहे,
तुम्ही ज्या व्यक्ती साठी रडत आहात,
ती व्यक्ती दुसऱ्यांना खुश ठेवणासाठी व्यस्त आहे.

मराठी शायरी
मराठी शायरी

फुलाच्या वासाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही दूर का असेना आपली माणसं,
पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही.

कधीच चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका,
कारण त्यांना झालेला त्रास ते बोलून नाही दाखवत,
व ते तुमच्या आनंदासाठी शांतपणे,
तुमच्या आयुष्यातून निघून जातात.

कॉलेज मध्ये असताना,
स्वप्न मला दाखवलीस,
आणि कॉलज जीवन संपल्यावर,
दुसऱ्याबरोबर निघून गेलीस.

आजकाल लोकांचा वेळ,
ओळख नसलेल्या लोकांना impress करण्यात,
आणि ओळखीच्या लोकांना ignore करण्यात जातोय.

“एकवेळ कपडे फाटले तर शिवता येतात,
पण आयुष्याचा जोडीदार फाटक्या कपड्यांसारखा असेल तर,
तुमच्या आयुष्याच्या चिंद्या झाल्याचं म्हणून समजा.”

Text Shayari in Marathi

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा,
पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात,
पण माणसं परत कधीच येत नाही.

Text Shayari
Text Shayari

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा आहे,
त्यातील जीव आहेस तू .

अबोल राहून गैरसमज निर्माण होतात,
बोलून भांडणं झाले तरी चालेल,
निदान समोरच्याला समजेल तरी,
आपल्या मनात काय आहे.
आणि त्याच्याही मनात काय आहे,
हे आपल्याला समजेल..!!

शब्द कितीही काळजीपूर्वक,
वापरले तरी,
ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे,
त्याचा अर्थ लावत असतो.

मला पाहिजे तशी परी आहेस तू,
Life Time मला तुझा गर्व होईल,
अशी माझी जान आहेस तू.

आपले चौघांचे कुटुंब असेल,
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल,
दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर,
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल…..

Marathi Sayari
Marathi Sayari

खूप त्रास होतो,
जेव्हा एखाद्या व्यक्तीची,
आपल्याला सवय लागून जाते,
आणि तीच व्यक्ती आपल्याशी,
हळू हळू बोलायची बंद होते.

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली,
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली,
त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता,
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या…..

समोरच्याला जितकी गरज असेल,
तेवढी तो तुमच्याशी,
तितक्या जवळीकतेची सोबत ठेवतो.
गरजे व्यतिरिक्त ह्या जगात काहीच नाही.
गरज हीच फक्त,
माणसाला माणसाशी जोडून ठेवते.

आधी तुला गमवायची मनात भीती होती,
पण आता नाही, कारण मी तुझ्यावर कितीही,
प्रेम केला ना तरी तुला त्याची किंमत नाही,
तुला फक्त तुझाच गोष्टी महत्वाच्या आहेत,
तुझा गोष्टीसमोर माझ्या भावना शून्य आहेत,
हे आज समजला मला.

Shayari Marathi Text

खोटं बोलणं हे क्रेडिट कार्ड वापरण्यासारखं आहे,
आज तुम्ही खोटं बोलून आनंद घ्याल,
पण नंतर जस क्रेडिट कार्डच बिल भराव लागत,
तसच खोटं बोलल्याची किंमत मोजावी लागते.

Text Shayari
Text Shayari

स्वावलंबन करून, स्वकष्टार्जित,
तसेच नेकीने व प्रामाणिकपणे,
प्रयत्न करून कमावलेले धन,
निःसंशय सुख-समाधानकारक असते,
आणि जोडीस जोड परधनाची,
लालसा न ठेवल्यास अधिक उत्तम जीवन लाभते.

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली,
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली,
स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती,
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती….

Successful माणूस तोच होतो,
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी,
तो त्याचे सरबत करून पितो..!!

चांगलेपणा, आपलेपणा सगळ्या गोष्टीतून दिसला पाहिजे,
नाहीतर फक्त देखावा कराल तर,
समोरच्याला ते कधीतरी समजेलच.

तुमच्या नशिबात प्रचंड मोठा समुद्र आहे,
पण तुमचा स्वभाव कचऱ्यासारखा असेल,
तर समुद्र तुम्हाला किनाऱ्यावर नक्की फेकणार.

Marathi Shayri
Marathi Shayri

मनात काय आहे ते स्पष्ट बोलावे,
न बोलता, अंतर निर्माण होण्यापेक्षा,
बोलून निर्णय घेणं कधीही चांगले.

एकांतात फ़क्त वाईट विचार येत नाहीत,
तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर मिळतात,
स्वताला स्वताची ओळख होण्याची तीच एक वेळ असते.

वास्तवात नाही,
पण तिच्या स्वप्नात होता…..
१४ फेब्रुवारी ला लग्न,
व्हायचा विचार होता,
लग्नानंतर रोज एक चोकलेट,
आणि रोज बाहेर फिरायला जायचं
असा तिचा हटट होता…..

जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ देऊ नका,
एक अन्नाचा कण,
आणि दुसरा आनंदाचा क्षण.

As we wrap up this exploration of Shayari in Marathi, it’s clear that the emotional depth and intricate wordplay in Sher Shayari Marathi provides a unique blend of culture and tradition. The profound impact of Shayari in Marathi reaches far beyond its beautiful words, forming a bridge between hearts and minds.

Sher Shayari Marathi truly embodies the spirit and richness of Marathi language and culture. As we continue to delve into the world of Shayari in Marathi, we become more connected to its intrinsic beauty and deep significance. So, the next time you come across Sher Shayari Marathi, pause and appreciate its profound essence.

Keep exploring the eloquent universe of Shayari in Marathi and let the rhythm of Sher Shayari Marathi resonate with your soul.